सांगली : लातूरला 50 व्हॅगन्सच्या 30 व्या ट्रेनद्वारे आज दिनांक 18 मे 2016 रोजी सायंकाळी 5.40 वाजता 25 लाख लिटर्स पाणी पाठविण्यात आले. आज पाठविण्यात आलेल्या 25 लाख लिटर्स पाण्यामुळे आजपर्यंत (दि. 11 एप्रिल ते 18 मे) लातूरकरांना 7 कोटी, 95 लाख लिटर्स पाणी पाठविण्यात आहे. तत्पूर्वी रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने 10 व्हॅगन्सच्या प्रत्येकी 5 लाख लिटर्स अशा 9 रेल्वेद्वारे 45 लाख लिटर्स पाणी पोहोचवण्यात आले आहे. सांगली-मिरजकरांच्या या माणुसकीमुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला असून लातूरकरांकडून समाधानाची भावना व्यक्त होत आहे. साभार: महान्यूज]]>