या लाडक्या मुलानो, आईच्या लेकरानो देशाच्या भावी पिढ्यीनो, कीती गुण तुमचे गाऊ. मातेच्या गर्भी मोती, प्रगटे अनमोल ज्योती, देवाचे सुंदर फुल, पाहताच पडते भुल. रामाचे रूप पाहु, कृष्णाचे रूप पाहु, संस्कारानी न्हाऊ घालु, देवत्व त्यात पाहु. नामाची करा अंतरी रूजवण, मनाचे करा शुद्धीकरण, ये सोनुल्यानो फडकवा या देशात, हिंदु राष्ट्राचे निषाण. धर्माच्या पायावर, बांधा मनाचे घर, कोठेही जगी तुम्ही असता, मिळे ईश्वरी आधार. मायेतील मजा चाखा, पण धर्म नितीची जाण राखा, देवांचा हा भारत ठेवावा तुम्ही शास्वत. आमची साधक बाळे, जगतास जाऊन बोले, आम्ही न कमी कशात, आमचा भारत श्रेष्ठ जगात. जय श्री कृष्ण सौ बद्दी (संकलन:- डॉ.उदयजी धुरी)]]>